Skip to main content

अपुरी स्वप्न बघताना...

*अपुरी स्वप्न बघताना.....*

स्वप्नांची ती पाखरे आजकाल
खुप दुरवर उडत जातात...
उंचच उंच झोका घेऊन
त्या स्वप्नांना मुठीमधे काबिज करु पाहतात....

शेवटच्या रक्ताच्या थेंबापर्यंत,
ही लढाई लढेल म्हणतो..
अपुर्ण त्या स्वप्नांना ,
निर्धेड छातीने अाव्हाने देईन म्हणतो...

पण अडथळे या जीवनातले
मला थांबवु पाहतात..
माझ्या पायांना, अपयशाच्या तलवारीने
ते  अधु करु पाहतात...
पण रक्त माझं सळसळत असतं
आणि ह्रदय मात्र पुन्हा
तसचं धडधडत असतं....
खचुन न जाता ,
आशेच्या किरणांची ती वाट बघत असतं...

चिखलात या मी फसलो आहे...
पण मला इथे
फुलवायचे आहे कमळ...
बैचेन या ह्रदयाची ती ओढ
सुटता सुटत नाही..
बेरंगी फुलांचा
सुंगध दरवळल्याशिवाय
मन हे मानत नाही....
त्या आसमंताला सुद्धा झेलावे
लागेल माझे अश्रू एक दिवस...!!
दु:खाचे आणि काळाने आनंदाचेही..
फुलवावे लागले त्याला
फुले या बोचणार्या काट्यांतही....!!

भलेही काळोखात लढेल मी
ही लढाई या जीवनाची..
पण एक दिवस नक्कीच
प्रकाशात बघेल
दाटी मी त्या विजयी सुर्य किरणांची .....

- नयन मोहितकर...

Comments

Popular posts from this blog

जात म्हणजे काय?

आजकाल बागेत अनेक प्रकारचे पक्षी येतात. उन्हाळ्यामूळे त्यांचा जीवामधे पण काहुर माजत असावा.घोटभर पाण्यासाठी त्याच सैरावरा हिंडण बघवत नाही.पाण्याच्या एका घोटासाठी कित...

अश्याच एका भयाण रात्री...-Marathi Kavita

अश्याच एका भयाण रात्री... रात्री पडलेला चांदण्यांचा लख्ख प्रकाश बरच काही सांगून जात होता मनात माझ्या विचारांच दवंदव खिळवून ठेवत होता.. अश्याच एका रात्री.. आकाशात चांदण पडावं वार्याची मधेच थंडी लहर यावी.. अाणि मी तुझा हात हातात घ्यावा आणि मनामधलं सारं काही तुला एका झटक्यात सांगून द्यावं.. पण ढगांच्या त्या गडगडाटाने मी सारं काही विसरुन जावं... ती शांतता खुप भयाण वाटत होती. ह्रदयाच्या ठोक्यांना अजुन गती देत होती.. मात्र झाडांच्या पानांचा तो सळसळाट नकोसा वाटत होता. फक्त तो तिचा काही क्षणांचा सहवास हवा होता. तिच्या डोळ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम बघुन ह्रदय अगदी शांत व्हायचं. मात्र मी तसाच अबोल राहुन निघून जायचो.. तिच्याबद्दल माझ्या ह्रदयाला बरच काही सांगायचं होतं आज निश्चय केला सगळं सांगुन द्यायचा. वाट खुप लांब वाटत होती क्षणाक्षणाला माझी भिती वाढत जात होती मधेच तो रातकिड्यांचा आवाज पानांचा सळसळाट, ढगांच गडगडणं असं सार काही अंगावर काटा आणनार होतं. मी धावत पळत त्या ठिकाणी पोचलॊ मात्र ती मला दिसली नाही.. तिची आकृती सारखी डोळ्यांसमोर येत होती माझ्या ह्रदयाला झटके देऊन ...

ये कैसा धर्म ....??

ये कैसा धर्म...????*      मागे एकदा प्रवास करत असताना एके ठिकानी गाडी नाश्त्यासाठी थांबली. तसे सगळे प्रवासी उतरले, आणि मी ही त्या कॅन्टीन च्या  एका कोपर्यात एका टेबलवर बसलो.   तेव...