आजकाल बागेत अनेक प्रकारचे पक्षी येतात. उन्हाळ्यामूळे
त्यांचा जीवामधे पण काहुर माजत असावा.घोटभर पाण्यासाठी त्याच सैरावरा हिंडण बघवत नाही.पाण्याच्या एका घोटासाठी किती ते मरणं,त्यांना ना जात असते ना पात...एकच पाण्याची आस ...
मग जात म्हणजे नेमकं काय?
हा प्रश्न मात्र सहज छळुन जातो.निरागस त्या जीवाला
हिंदू-मुस्लिम, शिख,पारसी सगळ्यांच घरच पाणी चालतं
पाणी पिल्यानंतर त्यांच सैराट होण मनाला लाभवुन जातं.
त्यांना धर्म ,पंथ,जात माहिती नाही,म्हणुन प्रत्येकाच्या घरातल्या पाण्याने त्यांची तहान भागत असावी....
कुणी पाडले धर्म? कुणी केल्या जाती?
हाडामासांच्या या निरागस माणसाला रंगामधे विभागलं गेलं,नाही हिरवा रंग मुस्लिमांचा असं कशावरुन म्हणता तुम्ही? हिरवी साडी, हिरव्या बांगड्याने भरवलेली देवी पण हिंदुचीच नाही का?
केशरी शाल दर्ग्यावर पांघरणारे मुस्लिमच...निळ्या रंगाचं आकाश आणि पाणी सगळ्या धर्मानांच आसरा देणारं
रंगामधे कुठं आला हो धर्म..?
"सबके खुन का रंग एक बनाया खुदा तुने
पर इस रंगो ने ही इन्सान को बिछडा दिया खुदा तुने"
शिकावं त्या पक्ष्यांकडुन ,मिळालेलं जीवनं आनंदाने जगावं
आणि मनसोक्त उडावं फक्त एका धर्माचे म्हणुन,एका जातीचे म्हणुन "माणुसकी" ...!प्रेमाला ना जात असते ना धर्म,असतं ते फक्त दोन जीवांमधलं निरागस जगणं...
प्रेम करत सुटावं प्रत्येकावर ,कुणाच्या आनंदी निर्मळ जगण्यावर,कुणाच्या त्यागावर, कुणाच्या नात्यावर...
प्रेम कुणावरही करावं
कारण प्रेम आहे
माणसाच्या संस्कॄतीचा सारांश
त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष
आणि भविष्यकालातील त्याच्या अभ्युदयाची आशा एकमेव ..... !(कुसुमाग्रज)
त्या पक्षांकडुन एवढच कळतं, त्यांचासारखं प्रत्येक माणसाला मनसोक्त उडू दे, सुंदर या जगात मानाने बागळु दे ..त्याच्या पंखाप्रमाणे आमच्यापण माणुसकीच्या पंखाना बळ येऊ दे..प्रत्येक माणसाला या जातिच्या विळख्यातुन बाहेर काढुन एका माणुसकीच्या नव्या जगात स्वच्छंद श्वास घेऊ दे...
नाहीतर दिवसेंदिवस एकच प्रश्न मनाला छळत राहिल
जात म्हणजे नेमकं काय?
-नयन मोहितकर...
-
अश्याच एका भयाण रात्री... रात्री पडलेला चांदण्यांचा लख्ख प्रकाश बरच काही सांगून जात होता मनात माझ्या विचारांच दवंदव खिळवून ठेवत होता.. अश्याच एका रात्री.. आकाशात चांदण पडावं वार्याची मधेच थंडी लहर यावी.. अाणि मी तुझा हात हातात घ्यावा आणि मनामधलं सारं काही तुला एका झटक्यात सांगून द्यावं.. पण ढगांच्या त्या गडगडाटाने मी सारं काही विसरुन जावं... ती शांतता खुप भयाण वाटत होती. ह्रदयाच्या ठोक्यांना अजुन गती देत होती.. मात्र झाडांच्या पानांचा तो सळसळाट नकोसा वाटत होता. फक्त तो तिचा काही क्षणांचा सहवास हवा होता. तिच्या डोळ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम बघुन ह्रदय अगदी शांत व्हायचं. मात्र मी तसाच अबोल राहुन निघून जायचो.. तिच्याबद्दल माझ्या ह्रदयाला बरच काही सांगायचं होतं आज निश्चय केला सगळं सांगुन द्यायचा. वाट खुप लांब वाटत होती क्षणाक्षणाला माझी भिती वाढत जात होती मधेच तो रातकिड्यांचा आवाज पानांचा सळसळाट, ढगांच गडगडणं असं सार काही अंगावर काटा आणनार होतं. मी धावत पळत त्या ठिकाणी पोचलॊ मात्र ती मला दिसली नाही.. तिची आकृती सारखी डोळ्यांसमोर येत होती माझ्या ह्रदयाला झटके देऊन ...
Comments
Post a Comment