जगण्याचे कारण मला बनायचं ……. तुझ्या मंद स्मितावरची मला खळी बनायचं तुझ्या रडण्यानंतर ते अश्रू पुसणारे हात मला व्हायचय आणि असे करता करता तुझ्या जगण्याचे कारण मला बनायचय……. तुझ्या प्रत्येक ते स्वप्न मला पूर्ण करायचय कधीतरी मला तुझ्या स्वप्नासारख उंच उडून तिथून तुला बघायचय आणि असे करता करता तुझ्या जगण्याचे कारण मला बनायचय……. तुझ्या विश्वातल्या सगळ्या विचारांची काळजी मला करायचीय तुझ्या सुंदर हाताने स्पर्श झालेल्या प्रत्येक वस्तूचा सुगंध मला व्हायचय . आणि असे करता करता तुझ्या जगण्याचे कारण मला बनायचय……. फुलपाखरासारखे रंगीबेरंगी रंग तुझ्या आयुष्यात मला भरायचे आहे आहे माझ्या स्वप्नातल्या सुंदर महालाची राणी तुला बनवायचय. आणि असे करता करता तुझ्या जगण्याचे कारण मला बनायचय……. तुझ्या आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक संकटातून मला तुला वाचवायचं आहे आणि हे करताना मला फ़क़्त आणि फ़क़्त तुला बघत म...
poetry, articles,stories and many more ...