ये कैसा धर्म...????*
मागे एकदा प्रवास करत असताना एके ठिकानी गाडी नाश्त्यासाठी थांबली. तसे सगळे प्रवासी उतरले, आणि मी ही त्या कॅन्टीन च्या एका कोपर्यात एका टेबलवर बसलो.
तेवढ्यात एक मनुष्य तिथे आला आणि विचारल
"इथे कुणी बसलयं? "
मी सहजच त्याला म्हटलं "नाही ,कुणी नाही..!!
तसा तो माझ्या पुढ्यात येऊन बसला, मी त्याच्याकडे बघुन स्मितहास्य केलं,तो सुद्धा हसला.
तसा एकजण आमची आर्डर घ्यायला आला ,मी आणि त्याने आर्डर केली. थोड्यावेळात तो तरुण आमची आर्डर घेऊन आला. तसं मी आणि त्यानेही खाण्यास सुरुवात केली. आणि खाता खाता मला ठसका बसला ,तिथे आजुबाजुला कुठेच पाणी नव्हते, त्याने धावत जाऊन माझ्यासाठी पाणी आणले,आणि मला पाजले. तसा माझा जीव शांत झाला.
"Thanks " असं मी त्याला बोललो.
त्यानेही मला स्मितहास्य करीत welcome असं म्हटलं.
"जास्त तिखट होत काय?" त्याने विचारलं
"नाही, मलाच गडबडीत ठसका बसला " तसा मी उत्तरलो.
तसं आमचं पुढच बोलणं चालू झालं, आणि सगळ्यात आश्चर्य करण्याजोगी गोष्ट तर तेव्हा घडली, जेव्हा मी त्याला त्याचं नाव विचारलं "अब्दुल अरबाज खान ".....
तर हा शुद्ध मराठी बोलणारा अनोळखी माणुस एका झटक्यात माझ्या जवळच्या ओळखीचा झाला. मनात विचारांच दवंदव चालु झालं, की कुठे आला रे धर्म आधी??
मला त्या माणसाचा धर्म,जात माहित नव्हती, पण त्याने माणुसकी या नात्याने मला पाणी पाजलं ...
मग माणुसकी आधी आली की त्याचा धर्म??
मला माझ्या मतावर, आणि काही थोर संतांच्या,विचारवंताच्या मतांवरचा विश्वास ठाम झाला.
"माणुसकी" हा सगळ्यात मोठा धर्म आहे ..त्याशिवाय कोणताच धर्म मोठा नाही. कारण तो धर्म पवित्र आहे, त्याला सांगायची गरज नाही की तो श्रेष्ठ आहे.
आजकाल म्हणजे कसं झालयं...प्रत्येक जण म्हणतोय माझा धर्म श्रेष्ठ ..माझ्या धर्माला सगळ्याजनानी फॅालो करयला हवं.
वेगवेगळ्या धर्माचं "marketing" करता करता बहुतेक लोक त्यांचा खरा धर्म विसरलेत..
तुम्ही लाख धर्म काढा हो , कोणत्याही धर्माला follow करा ..
पण "माणुसकी " विसरु नका रे...
या सगळ्यात मोठ्या धर्माचा मात्र ह्रास व्हायला लागला रे दिवसॆंदिवस..!!!!
मी धर्माविरोधी नाही..तो माझा हक्क सुद्धा नाही..पण माणुसकीचा ह्रास ज्या धर्माने होत आहे, असा तुमचा धर्म काय कामाचा? ? काही जनानी त्याला अधर्म असं म्हटलयं, हा तुमचं म्हणनं बरोबर आहे, पण मग रोज नवीन धर्म जन्माला येतात, ज्याच्या नावाखाली माणुसकी पायदळी तुडवली जाते...मग हे तुमचे धर्म श्रेष्ठ कसे झाले? ?
कुणीतरी खुप सुंदर लिहलय..
" धर्मात्मा बन लूटते हैं धर्म ही के नाम पर
हंसने लगा शैतान भी अब आदमी के नाम पर...
ये मन्त्रों के जाप से उपचार का दावा करें
सब खोखले अल्फ़ाज़ हैं संजीवनी के नाम पर...
बाबा चमत्कारी मदारी की कला में कम नहीं
अब तो विदेशी गाड़ियां हैं स्वामी जी के नाम पर"
धर्माच्या नावाखाली तुम्ही हे सगळे चाळे करता, मंत्र, पुजा पाठ या सगळ्याने तुम्ही माणसाचे रोग बरे केले असते, तर विज्ञानाने ऎवढी प्रगती केलीच नसती...
मग अश्या माणुसकीच्या ह्रास करणार्या धर्माचा वध करण्यात वावगं काय? असा सहज प्रश्न मनात येतो.......
अरे धर्म -धर्म करुनच आपली प्रगति खुंटलीये , धर्म, जात अंधश्रद्धा,पुजापाठ, होमहवन,प्रथा हे सगळे कारण आहे त्या अप्रगत अश्या देशाला..!!!
एखाद्या मुस्लिम आईने आपल्या मुलाला फॅन्सी ड्रेस स्पर्धेसाठी क्रिष्णाचा अवतारामधे सजवलं तर तॆ तुम्ही
"diversity" च्या नावाने गोडवे गाता, परंतु तेच एका रामलीले मधे एका मुस्लिम कलाकाराला तुम्ही पात्र साकारण्यापासन थांबवता, का? कारण ते पात्र हिंदु होतं, आणि ते एक मुस्लिम मनुष्य साकारू शकत नाही, तिथे तुमचा धर्म भ्रष्ट होतो!!!! यात कसला आला रे तुमचा धर्म श्रॆष्ठ ??? पुन्हा तिथे माणुसकीची गरज भासत आहे, कदाचित या गोष्टीवर तुमच्या मनात कुठेतरी खोलवर विश्वास असता, की माणुसकी सगळ्या धर्मापेक्षा मोठी आहे तर कदाचित असं कृत्य तुमच्याकडुन कदापिही होण शक्य नव्हत......
"कोई जगह ऐसी नहीं आतंक से महरूम हो
आतंक की बुनियाद भी है धर्म ही के नाम पर
मासूम बच्चों के लबों से मुस्कराहट छीन ली
क्यों जान लेते हो ख़ुदा की बन्दगी के नाम पर ?
हैवानियत की गोद में पलने लगा जब आदमी
रोने लगी भी इनसानियत बेकसी के नाम पर."
आतंकवादाचं मुळ पण धर्मा पासनं चालु होतं.जेव्हा एका लहान मुलाच्या चेहर्यावरचं हास्य तुम्ही एका झटक्यात संपवता, धर्माच्या नावावर! !!! मग तो मुलगा तुमच्या धर्माचा असु दे की नसुदेत त्याने काही फरक पडत नाही, पण इथे तुमचा धर्म मात्र सपशेल हारतो!!! देवाच्या नावावर तुम्ही त्यालाच संपवायला निघाला आहात, मग इथे तुमचा धर्म मात्र श्रॆष्ठ होत नाही...जेव्हा मनुष्य अमानवी वर्तनाच्या मागे जातो, तेव्हा माणुसकी सुद्धा त्या देवापाशी जाऊन रडत असावी......
ये तुम्हारा कैसा धर्म है? ? जिसके नाम पे सब गलत सही हो जाता है??
असा प्रश्न मात्र वारंवार छळतो..मग कुठेतरी या धर्मांवरचा विश्वास उडायला लागतो..मग माणुसकीच श्रेष्ठ वाटायला लागते.. वेगवेगळ्या धर्माची शिकवण तर मला एकच सांगते की माणुसकी आणि आपल्या कर्माशिवाय काहीच श्रेष्ठ नाही, धर्म सुद्धा नाही...!!
"धर्म के नाम पर होते हैं चमत्कार ।
धर्म माफ़ करवा देता है बलात्कार ।।
धर्म हो तो नशा भी लगता है प्रसाद ।
धर्म के नाम पर लोग होते हैं बर्बाद ।।
धर्म के नाम पर पशुओं का मलमूत्र भी है स्वीकार ।
वो ही धर्म इंसानों का करता है बहिष्कार ।।
धर्म के नाम पर पूज्य हो जाते हैं नंगे ।
धर्म के नाम पर मौज उड़ाते है भिखमंगे ।।
दया धर्म का मूल है ।
लेकिन यही धर्म इंसानियत पर शूल है ।।
धर्म सिखाता है आपस में करना प्यार ।
सबसे ज्यादा धर्म ही करता है नफरत का प्रसार ।।
या धर्माच्या नावाखाली आज कित्येक लोक, त्यांचे स्वामी, त्यांचे बाबा, चमत्कारासारख्या गोष्टीला थारा देतात.कित्येक स्त्रियांचे बलात्कार या धर्माच्या नावाखाली होतात, या धर्मामधले पुज्य लोक सुद्धा पैसा ,स्वार्थ नावाच्या भस्मासुरापुढे आपली नांगी टाकुन आजच्या जनतेला लुटतात....आणि धर्माच्या नावाखाली रोज आमची "माणुसकी" मात्र नंगी होते..
मागे एकदा मी दसर्याच्या दिवशी मत मांडले की "ज्याप्रमाणे दुर्गादेवीने महेशासुराचा वध केला तसा आपण माणूसकी चा र्हास करणार्या धर्मरुपी राक्षसाचा वध केला पाहिजे " तर त्यावर एका सत्पुरूषाने मला असं सुचवलं की धर्मा चा वध करा असं मत मांडुन तुम्ही तुमची वैचारिक दिवाळखोरी दाखवत आहा,तुम्ही जो सण साजरा करत आहात तो पण एका धर्माचाच आहे......असो तर त्यांच म्हणनं अस होत की सगळ्यात मोठा तो धर्म! मी त्याला वेगवेगळी उदाहरणे देऊन हेच पटवून देत होतो की, बाबा रे "माणुसकी या धर्मापेक्षा कोणताही धर्म मोठा नाही, सगळे धर्म त्यापेक्षा छोटे आहे " कदाचित हाच मुद्दा मला पटवुन द्यायचा होता त्यामुळे हा सगळा प्रपंच.....असो ,तर ही धर्म नावाची परंपरा बरेच वर्षापासनं चालत आली, त्यामुळे त्याच पाणी मातीमधे अगदी जाम मुरलं गेलय,त्यामुळे ते पाणी काढताना त्रास तो होणारच!!!! पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे अशी की जी लोकं भरपुर शिकली आहे, वैचारिक दृष्ट्या सबळ आहे असे लोक सुद्धा धर्म-धर्म करतात, आणि त्या नावाखाली काय काय प्रकार ते देव जाणे!!..मी धर्माविरोधी नाही ..पण अरे तुमचा धर्म आहे ना समाजाच्या वैचारिक, शैक्षणिक,औद्योगिक प्रगतीला कुठेतरी खुपतोय..!!हरिवंशराय बच्चन यांची खुप सुंदर अशी कविता आहे....त्यातल्या काही ओळी हा मुद्दा अगदी ठासुन पटवुन देतात...
"ना भगवानों की लीला होती, ना अवतारों का नाटक होता...ना देशों की सीमा होती , ना दिलों का
फाटक होता....
ना कोई झुठा काजी होता, ना लफंगा साधु होता.
ईन्सानीयत के दरबार मे, सबका भला होता .....
तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता, काश कोई धर्म ना होता.....काश कोई मजहब ना होता....
तुझको जो जख्म होता, मेरा दिल तड़पता.
ना मैं हिन्दू होता, ना तू भी मुसलमान होता....
तू भी इन्सान होता, मैं भी इन्सान होता......
धर्माच्या नावावर तुम्ही हजारो मैल चालता, पण एका आंधळ्याला रस्ता पार करुन द्यायची साधी माणुसकी तुमच्यात उरलेली नाहीये. त्याच नावावर तुम्ही दगडाला अन्न चारण्यात ,त्याची पुजा करण्यात पैसा घालवता पण एका भुकेल्याला तुम्ही साधे अन्न देऊ शकत नाही ...
आणि शेवटी नुसतं "देव-देव " करुन कुणालाच देव सापडला नाही हो!!...तुमच्या धर्म नावाच्या थोतांडामुळे तर तो कदापिही सापडणार नाही..शेवटी संत सुद्धा सांगुन गेले. देव माणसात लपलेला आहे..."जो माणुस माणुसकीच्या वाटेवर चालतो" त्या माणसात देव शोधावा..
" माणुस द्या मज माणुस द्या हो
भिक मागता प्रभु दिसला" (तुकडोजी महाराज)
शेवटी देवाची अवस्था सुद्धा अशीच होईल ,तुमच्या धर्म नावाच्या थोतांडामुळे माणुस नावाची गोष्ट संपुन जाईल.. .
राम मनोहर लोहियाजींच खुप सुंदर असं वाक्य आहे..
" राजनिती अल्पकालिन धर्म है
और धर्म दिर्ग -कलिक(सदियो चलने वाली) राजनिती है"!!
या धर्माच्या राजकारणात आपण कसं खेळवलं जाणार आहो हे कुणालाच माहिती नाही ..कारण धर्माच्या नावावर बनलेले पागल हे सगळ्यात विध्वसंक असतात ,आणि जे लोक समाजामधे फुट पाडु इच्छिता, त्यांना या पागलांचा उपयोग कुठे व कशारितीने करायचा हे बरोबर ठाऊक असते! !!!!
या धर्माच्या नावाखाली दगडाची पुजा आपण करतो, पण ज्या आई बाबाने जन्म दिला त्यालाच आपण कुठतरी विसरतो, या धर्मानुसार पशु आपली माता बनते, परंतु एका मुलीला त्याच मातेच्या पोटात मारले जाते..धर्माच्या नावाखाली तुम्ही बायबल, कुराण, भगवद्तगीता वाटता परंतु कुठेतरी गरिब अशिक्षित बालकाला शाळेचं पुस्तक वाटण्याची साधी माणुसकी तुमच्या जवळ नाही...
मग खरच या सगळ्यांच्या अाड माणुसकी येते,ती धर्मापेक्षा खरच श्रेष्ठ आहे...मग माणुसकी नावाचा धर्मच मला मोठा होउन बसतो,आणि खरच आपण हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे...नाहीतर माणुसकीचा ह्रास करणार्या या राक्षसाला पाहुन एकच प्रश्न मनात येईल..."ये कैसा धर्म ????"........
-नयन राजेंद्र मोहितकर...
Comments
Post a Comment