गुरु ....
पावसाच्या त्या अनेक थेंबामधे
तु या लहान थेंबाला टिपत होतास
त्या थेंबाचा समुद्र घडवण्यासाठी
तु मात्र रोज झटत होतास
वाहणार्या हवेची तु
नेहमी दिशा बदलत राहिला..
फुलणार्या या बेरंग फुलामधे
तु स्वतःचा सुगंध वाहिला..
पाण्यामधल्या चिखलामध्ये सुद्धा
तु कमळ फुलवावा
कोवळ्या या मनाच्या मातीमधुन
तु विज्ञानाची मडके घडवणारा कुंभार शोधावा..
जगातली सगळी स्वप्ने पुर्ण
करण्यासाठी..
तु या रोपट्याला पाणी देत राहिला..
आणि माणसाच्या या रुपात
मी त्या गुरुत देव पाहिला..
-नयन राजेंद्र मोहितकर..
Comments
Post a Comment