Skip to main content

ज्योतिषी ..... -Marathi article

ज्योतिषी .....



"यांच पण भविष्य बघ न भाऊ"
अस सहज त्या ज्योतिषाला म्हटलं.त्यानेही लगेच उत्तर दिल
"त्यांना कुठं भविष्य असते काय?"
तशी फार वर्षापूर्वीची नाही, एका वर्षाआधीची ही गोष्ट
मी आणि माझे काही मित्र ज्योतिबाला गेलो होतो.ज्योतिबा हे कोल्हापूरपासनं १५ कि.मी अंतरावर असलेलं देवस्थान.
त्याला केदारेश्वर किवा केदारलिंग पण म्हटले जाते .
     डोंगरावर तीन देवळे आहेत,तसे आम्ही तिथे पोहचलो.
दर्शन घेतलं आणि सहज त्या देवळाच्या परिसरात फेरफटका मारायला सुरवात केली.तसा एके ठिकाणी एक
ओळीने बसलेली माळ होती.कशाची? तर ज्योतिषीची..
त्यातला एकजण सहज आम्हाला बोलवून घेऊन म्हणू लागला "मी तुमचं भविष्य बघतो",तसा मला ज्योतिष्यशास्त्रावर विश्वास नाही,पण माझा मित्र सहज हात दाखवुन बघु म्हणतं खाली बसला.त्याने त्याचा हात आपल्या हातात घेतला,त्याला त्याचं नावं,जन्म असं बरचं काही विचारलं आणि भविष्य सांगायला सुरवात केली.
तेवढ्यात एक मुलगा माझ्या शेजारी येऊन मला पैसे मागु लागला,त्याचा अवतार बघुन मी सहजच त्याच्या हातावर ५ रु.टेकवले.पुन्हा एकजण येऊन मला पैसे मागायला लागला,मी त्याच्या हातावर २ रु. टेकवले.पण काही वेळानंतर कळालं
असे भिक मागणारे एक-दोन नाही पूर्ण फौज होती..
तसा ज्योतिषीने माझ्या मित्राला बरचं काही सांगितलं.आणि तुझ्या कुंडलीत काहीतरी दोष आहे असं सांगुन त्याला एक अंगुठी दाखवली, "हि अंगुठी २१ दिवस घाला तुमच्यावर येणारं संकट टळेल,अंगुठीची किंमत? १५० रु. तसा माझ्या मित्राने घ्यायला नकार दिला .तसा त्याने संकटापासनं वाचवणार्या अंगुठीची किंमत ५० रु केली.माझ्या मित्राने पण सहज एक्सपरीमेंट करायचं म्हणुन किंवा बघुतर काय होते असं म्हणुन ती घेतली.तसा मी पण माझा हात समोर केला आणि म्हटलं माझं पण भविष्य बघा.त्याने पण लगेच हात बघुन सांगण्यास सुरुवात केली.तस
माझ्याबद्दल(?)त्यानेही भरपुर काही सांगितलं.तेवढ्यात तिथे सहज पुन्हा एक मुलगी आणि त्यांच्या टोळितले चार पाच जण आजुबाजुला,त्यांनी भिक मागायला सुरुवात केली.आणि मी सहज त्याला विचारलं,
"यांच पण भविष्य बघ न भाऊ" त्यानेही लगेच उत्तर दिल्लं
"त्यांना कुठं भविष्य असते काय?"...
जाता जाता सारखां हा एकच विचार डोक्यात येत होता. या अनवाणी पोटाची खळगी भरण्यासाठी भिक मागणार्या मुला-मुलींना कुठलं आलं भविष्य? भविष्य बघण्याची गरज तर दोन टाईम सुखाने खाणार्याला आहे.त्यांना कुठं आलयं भविष्य? त्यांचा तर वर्तमानचं अंधारात आहे,मग भविष्य पण अंधारातचं असेल नाही का? ते माणसं नाहीत पोटाच्या भुकेसाठी फिरत सुटलेली जणावरं आहेतं.
         मनात मात्र अनेक प्रश्नांचा भडिमार होतो,अनेक प्रश्न अनुत्तरीत राहतातं,विचारांच हे दंवदव थांबता थांबत नाही.
माणुस एकदा त्याच्या वाटेमधनं भरकटलां,त्याच्या आयुष्यात एक दोन संकटे आली की, "जागेवरुन भविष्य सांगणार्या एका माणसाचा आधार घेतातं" जगण्याचा अर्थ स्वतः शोधण्यास जी मजा आहे ,ती त्या ज्योतिषीच्या भविष्य सांगण्यात नाही.कारण देवाने कदाचित त्यासाठीचं आपल्या वाटेत दगडे टाकली असावी,नाही का?
नाहीतर इथे तर निरर्थास पण अर्थ सापडतात,
"जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
जगावयास तेव्हा खरा अर्थ होता, निरर्थास अर्थ भेटायचे,
मना सारखा अर्थ लागायचे, अन मना सारखे शब्द ही यायचे"..-(सौमित्र)
माणुस त्याच्या वाटेमधनं भरकटल्या वर त्याला एका आधाराची गरज असते,त्याला आपणं मोटिवेशन असं  पण म्हणतो.आणि जेव्हा हा ज्योतिषी त्याला असं सांगतो की तुझ्या आयुष्यात सगळं काही ठिक होणारं आहे,फक्त मी सांगतो ते व्रत करं,मंत्र जप,पुजापाठ कर वगैरे वगैरे.तेव्हा आपल्या मनातच पाझिटीव मोटिवेशन तयार होतं आणि पुढची कामं आपोआप व्यवस्थितं होतात.ती कामं तुम्हीच करता,तो ज्योतिषी नाही किंवा त्याचे ते मंत्र, पुजापाठ वगैरे पण नाही.
  मला सहज प्रश्न मनात येतो ,ठिकं आहे मानलं तुम्ही हातावरणं ज्योतिष्य बघता वगैरे..पण त्यांच काय जे जन्मतः अपंग जन्मले त्यांना हातचं नाही,किंवा कुष्ठरोग्यांच काय?यांचा भविष्य तूम्ही कोणत्या रेघाने बघालं?
  हातावरच्या रेघा बघता बघता आपण जीवनाच्या कागदावर रेघा ओढायचं विसरुन जातॊ,आणि मग बुडत्याला काठीचा आधार याप्रमाणं त्या ज्योतिष्याचं ऐकतो.आपणं स्वतःच स्वतःच मोटीवेशन बनुन हातावरच्या रेघा बघत बसण्यापेक्षा त्या हातानेच भविष्य घडवावं.उद्याचं विचार करण्यापेक्षा मला आजं कसं सुंदर जगता येइल याचा विचार करावां
  "आज खुलकर जिले भैया मौका है
कल का सोच मत,क्युकी यहा कदम कदम पर धोका है"
कारणं त्या भिक मागणार्या मुला-मुलींपेखा तर तुमचं आयुष्य नक्कीच चांगलं आहे, मग त्या हातावरच्या रेघा बघण्यापेक्षा आपणं काहीतरी चांगलं करुन दाखवलं
तर त्या मुला-मुलींच्या आयुष्यात पण उजेड पडायला वेळ लागणार नाही..नाही का?.
असं कुणाचं भविष्य कुणाला बघता आलं असतं  तर,बघणार्याने स्वतःच भविष्य बघुन, त्यांच आयुष्य सुंदर केलं नसतं?..
आणि राहिला प्रश्न संकटाचा, फेलर चा तर एक गाणं सहजं आठवतं,
"जिंदगी की यही रित है,हार के बाद ही जीत है"..
असं म्हणुन पुन्हा जगत सुटावं या सुंदर जगात मनमोकळं, एका स्वच्छंदी उडणार्या पक्षासारखं .....
                                  




                                             -नयन राजेंद्र मोहितकर

Comments

Popular posts from this blog

जात म्हणजे काय?

आजकाल बागेत अनेक प्रकारचे पक्षी येतात. उन्हाळ्यामूळे त्यांचा जीवामधे पण काहुर माजत असावा.घोटभर पाण्यासाठी त्याच सैरावरा हिंडण बघवत नाही.पाण्याच्या एका घोटासाठी कित...

अश्याच एका भयाण रात्री...-Marathi Kavita

अश्याच एका भयाण रात्री... रात्री पडलेला चांदण्यांचा लख्ख प्रकाश बरच काही सांगून जात होता मनात माझ्या विचारांच दवंदव खिळवून ठेवत होता.. अश्याच एका रात्री.. आकाशात चांदण पडावं वार्याची मधेच थंडी लहर यावी.. अाणि मी तुझा हात हातात घ्यावा आणि मनामधलं सारं काही तुला एका झटक्यात सांगून द्यावं.. पण ढगांच्या त्या गडगडाटाने मी सारं काही विसरुन जावं... ती शांतता खुप भयाण वाटत होती. ह्रदयाच्या ठोक्यांना अजुन गती देत होती.. मात्र झाडांच्या पानांचा तो सळसळाट नकोसा वाटत होता. फक्त तो तिचा काही क्षणांचा सहवास हवा होता. तिच्या डोळ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम बघुन ह्रदय अगदी शांत व्हायचं. मात्र मी तसाच अबोल राहुन निघून जायचो.. तिच्याबद्दल माझ्या ह्रदयाला बरच काही सांगायचं होतं आज निश्चय केला सगळं सांगुन द्यायचा. वाट खुप लांब वाटत होती क्षणाक्षणाला माझी भिती वाढत जात होती मधेच तो रातकिड्यांचा आवाज पानांचा सळसळाट, ढगांच गडगडणं असं सार काही अंगावर काटा आणनार होतं. मी धावत पळत त्या ठिकाणी पोचलॊ मात्र ती मला दिसली नाही.. तिची आकृती सारखी डोळ्यांसमोर येत होती माझ्या ह्रदयाला झटके देऊन ...

ये कैसा धर्म ....??

ये कैसा धर्म...????*      मागे एकदा प्रवास करत असताना एके ठिकानी गाडी नाश्त्यासाठी थांबली. तसे सगळे प्रवासी उतरले, आणि मी ही त्या कॅन्टीन च्या  एका कोपर्यात एका टेबलवर बसलो.   तेव...