तो मुसळधार पाऊस....
मध्यरात्री मुसळधार पाऊस पडत असताना
बोचर्या थंडीने अंगावर शहारा यावा
आणि हळुच तुझी आठवण करुन द्यावा.
मी अलगदच पावसाचा थेंब माझ्या
अंगावर घ्यावा..
श्रृष्टीच्या त्या बेधुंद नशेमधे तो सुद्धा
डुंबुन जावा..
हळुहळु रात्र जात होती..
ह्रदयाला माझ्या ऒलचिंब करत होती.
मन उंचच उंच झोका घेत होत
धरतीला सुद्धा पावसाच बोलावणं
आलं होतं..
त्या मुसळधार पावसात मी सतत
तुझ्या येण्याची वाट बघत होतो.
तु कुठे त्या भयाण रात्री
हरवली तर नाहीस ना
यासाठी मनामधे गाठ बांधत होतो..
पावसाचा वेग जरा वाढला होता
तस माझं ह्रदय अगदी बैचेन होत होतं
सगळे पक्षी आपल्या घरट्यात दडुन बसलेले होते
मात्र मी माझ्या पक्ष्याची वाट बघत होतो..
कुठुनतरी पावसाची झाप माझ्या अंगावर पडावी
आणि तुझी उणीव अजुन तीव्र व्हावी..
परिसर अगदी निर्मनुष्य व्हावा
तुझ्या आठवणीत तो सुद्धा वेडा व्हावा..
माझं मन म्हणत होतं
तु येणार आहेस..असचं धावतं पळतं
येऊन मला गच्च बिलगणार आहेस.
आणि माझं सार भय एका क्षणात दुर करणार आहेस.
आता मात्र माझं मन रडत होतं
आरडाओरड करुन त्या पावसाला
जाब विचारत होतं...
पावसावा वेग थोडा कमी झाला
तसं माझं मन शांत झालं
मी थोड्या दुर चालत गेलो..
आणि ती मला दिसली..
तिथेच एकटी रडत बसलेली..
मनात कालवाकालव झाली ..
डोळ्यातनं अश्रूंचे ओघळ पाघळायला लागले
तिला गच्च बिलगुन तिचे अश्रू पुसावे
असं सारखं मनात येत होतं
पण मी या जगात नसताना सुद्धा माझ्या
आठवणीत तिला रडताना पाहुन
माझं ह्रदय अगदी शांत झालं होतं..
-नयन मोहितकर.
Comments
Post a Comment