बेभान मी...
काळजात रुतलेली तुझी छाया
अगदी डोळ्यात भरुन जातो मी..
माझ्याच रक्ताळलेल्या त्या अश्रूंत
पुर्णतः बेभान होतो मी..
मनातल उरलेलं तुझ्यावरच प्रेम
समुद्राला वाहुन आलो मी..
मात्र लाटांमधे त्याच्या
तुलाच शोधत होतो मी...
कित्येक प्रेमाच्या कथांमधे
तुलाच अनुभवत होतो मी
विसरलेलं तुझ्यासोबतचं जीण
क्षणात जगुन येतो मी..
हिरमुसलेल्या स्वप्नाच्या रात्री
प्रेमाचा उजेड शोधत होतो मी..
निर्मनुष्य त्या वाटेवर
स्वतःचेच अश्रू पुसत होतो मी...
किनार्यावरची प्रेमाची ति लाट
अलगद उचलत होतो मी..
ह्रदयाला त्यात माझ्या ढकलून
निरर्थक प्रयत्न करत होतो मी...
प्रेमाची परिभाषा माझ्याच
आत्म्याला सांगत होतो मी...
जगात या नसताना सुद्धा
तुझ्यातच बेभान होतो मी...
-नयन मोहितकर
Comments
Post a Comment