Skip to main content

विसरुनही विसरता येत नाही..marathi kavita

प्रेमाने उत्तुंग भरलेला समुद्र
आणि त्याच्या अलगदच येणार्या लाटांमधे
मदमस्त भिजलेली तु..
वार्याच्या त्या मंद झुळकेने हळुच
तुझ्या चेहर्यावर आलेला केस..
तु मोठ्या अदबीने सावरावा हळुवार..
माझे डोळे एकटक तुझ्याचकडे बघत रहावे
समुद्राच्या लाटांने बहरलेली ती संध्याकाळ
विसरुनही विसरता येत नाही...

गच्च अंधारात हळुच तु
माझा हात पकडावा...
मलाही प्रेमाचा स्पर्श हवाहवासा वाटुन
मी तो हात सैल सोडावा..
दोन चार पावलं चालुन
मधेच ढगांचा गडगडाट व्हावा
आणि तु अलगदच माझ्या कुशीत यावी..
मुसळधार पावसाने बरसलेली ती रात्र
विसरुनही विसरता येत नाही..

तुझ्या जाण्याचा विरह, या काळजात
चिरुन जात होता...
एकही शब्द न बोलता ह्रदयाचा पिंजरा व्हावा
आणि त्यात तुझ्या आठवणी कैद कराव्या..
पण आठवणीच त्या.....
तुझ्या जाण्यामुळे तुझी आठवण काढण सुद्धा
मला पाप वाटावं..
जुल्मी या दुनियेत माझं ह्रदयच बंद पडावं
आणि उरावं ते फक्त तुझं प्रेम...
अंधारलेल्या या जीवनात माझा श्वास  बनलेली तु
विसरुनही विसरता येत नाही.....
विसरुनही विसरता येत नाही.....

-नयन मोहितकर

Comments

Popular posts from this blog

जात म्हणजे काय?

आजकाल बागेत अनेक प्रकारचे पक्षी येतात. उन्हाळ्यामूळे त्यांचा जीवामधे पण काहुर माजत असावा.घोटभर पाण्यासाठी त्याच सैरावरा हिंडण बघवत नाही.पाण्याच्या एका घोटासाठी कित...

अश्याच एका भयाण रात्री...-Marathi Kavita

अश्याच एका भयाण रात्री... रात्री पडलेला चांदण्यांचा लख्ख प्रकाश बरच काही सांगून जात होता मनात माझ्या विचारांच दवंदव खिळवून ठेवत होता.. अश्याच एका रात्री.. आकाशात चांदण पडावं वार्याची मधेच थंडी लहर यावी.. अाणि मी तुझा हात हातात घ्यावा आणि मनामधलं सारं काही तुला एका झटक्यात सांगून द्यावं.. पण ढगांच्या त्या गडगडाटाने मी सारं काही विसरुन जावं... ती शांतता खुप भयाण वाटत होती. ह्रदयाच्या ठोक्यांना अजुन गती देत होती.. मात्र झाडांच्या पानांचा तो सळसळाट नकोसा वाटत होता. फक्त तो तिचा काही क्षणांचा सहवास हवा होता. तिच्या डोळ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम बघुन ह्रदय अगदी शांत व्हायचं. मात्र मी तसाच अबोल राहुन निघून जायचो.. तिच्याबद्दल माझ्या ह्रदयाला बरच काही सांगायचं होतं आज निश्चय केला सगळं सांगुन द्यायचा. वाट खुप लांब वाटत होती क्षणाक्षणाला माझी भिती वाढत जात होती मधेच तो रातकिड्यांचा आवाज पानांचा सळसळाट, ढगांच गडगडणं असं सार काही अंगावर काटा आणनार होतं. मी धावत पळत त्या ठिकाणी पोचलॊ मात्र ती मला दिसली नाही.. तिची आकृती सारखी डोळ्यांसमोर येत होती माझ्या ह्रदयाला झटके देऊन ...

ये कैसा धर्म ....??

ये कैसा धर्म...????*      मागे एकदा प्रवास करत असताना एके ठिकानी गाडी नाश्त्यासाठी थांबली. तसे सगळे प्रवासी उतरले, आणि मी ही त्या कॅन्टीन च्या  एका कोपर्यात एका टेबलवर बसलो.   तेव...