Skip to main content

चंद्र मग्न होता...

रात्रीच्या लुकलुकणार्या त्या चांदण्यात
मी तुलाच शोधत होतो
मग्न झालेल्या त्या चंद्राला
वर्णन तुझं सांगत होतो...

तुझ्या हळुवार हासण्याने सुदधा
अगदी अंगावर शहारा यावा..
आणि जुन्या आठवणीना उजाळा
देऊन जावा..
रात्रीच्या  हवेतसुद्धा एक
वेगळीच नशा होती..
चंद्राच्या प्रकाशात फक्त
तुझी आठवण साथ होती...
प्रेमात तिच्या मात्र
डोळ्याची पापणी ऒली होती
निर्मनुष्य त्या रात्री
फक्त तुझीच साथ हवी होती....

रात्रीच्या त्या भयाण शांततेत
कंठ दाटुन येत होता..
ह्रदयाला  माझ्या
प्रेमाचा अर्थ सांगुन जात होता.

ह्रदय मात्र स्वतःचे अश्रू
लपवुन मिरवत होते..
हरवलेल्या  त्या प्रेमाचे
कौतुक फार करत होते..
विझलेला  प्रेमाचा दिवा
हळुहळु पेट घेत होता....
मात्र हारलेल्या त्या ह्रदयात
अजुनही चंद्र मग्न होता... अजुनही चंद्र मग्न होता..

-नयन मोहितकर

Comments

Popular posts from this blog

जात म्हणजे काय?

आजकाल बागेत अनेक प्रकारचे पक्षी येतात. उन्हाळ्यामूळे त्यांचा जीवामधे पण काहुर माजत असावा.घोटभर पाण्यासाठी त्याच सैरावरा हिंडण बघवत नाही.पाण्याच्या एका घोटासाठी कित...

अश्याच एका भयाण रात्री...-Marathi Kavita

अश्याच एका भयाण रात्री... रात्री पडलेला चांदण्यांचा लख्ख प्रकाश बरच काही सांगून जात होता मनात माझ्या विचारांच दवंदव खिळवून ठेवत होता.. अश्याच एका रात्री.. आकाशात चांदण पडावं वार्याची मधेच थंडी लहर यावी.. अाणि मी तुझा हात हातात घ्यावा आणि मनामधलं सारं काही तुला एका झटक्यात सांगून द्यावं.. पण ढगांच्या त्या गडगडाटाने मी सारं काही विसरुन जावं... ती शांतता खुप भयाण वाटत होती. ह्रदयाच्या ठोक्यांना अजुन गती देत होती.. मात्र झाडांच्या पानांचा तो सळसळाट नकोसा वाटत होता. फक्त तो तिचा काही क्षणांचा सहवास हवा होता. तिच्या डोळ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम बघुन ह्रदय अगदी शांत व्हायचं. मात्र मी तसाच अबोल राहुन निघून जायचो.. तिच्याबद्दल माझ्या ह्रदयाला बरच काही सांगायचं होतं आज निश्चय केला सगळं सांगुन द्यायचा. वाट खुप लांब वाटत होती क्षणाक्षणाला माझी भिती वाढत जात होती मधेच तो रातकिड्यांचा आवाज पानांचा सळसळाट, ढगांच गडगडणं असं सार काही अंगावर काटा आणनार होतं. मी धावत पळत त्या ठिकाणी पोचलॊ मात्र ती मला दिसली नाही.. तिची आकृती सारखी डोळ्यांसमोर येत होती माझ्या ह्रदयाला झटके देऊन ...

ये कैसा धर्म ....??

ये कैसा धर्म...????*      मागे एकदा प्रवास करत असताना एके ठिकानी गाडी नाश्त्यासाठी थांबली. तसे सगळे प्रवासी उतरले, आणि मी ही त्या कॅन्टीन च्या  एका कोपर्यात एका टेबलवर बसलो.   तेव...