तुला फॅारेन कल्चर आवडतं?
अलीकडेच माझ्या एका मित्राने विचारलेला प्रश्न...आता कल्चर म्हटलं की, चर्चा कुठुन कुठपर्यंत जाते हे सांगायला काही नेम नाही, नाही तसं भारतात असल्या गोष्टीवर परखड मतं मांडण म्हणजे स्वतःच संकट ऒढवुन घेणं अस झालयं..असो..तर फॅारेन कल्चर आणि इंडियन कल्चर
काय फरक आहे?..नाही फॅारेन कल्चर आवडत नाही पण त्यातल्या काही गोष्टी नक्कीच आवडतातं..
आता बघा..कालपर्वाचीच गोष्ट ,ऒवेसी काय बोलला?,कन्हैया कुमार च काय झालं? अजुन काही निष्फळ चर्चा दाखवणारे आमचे न्युज चॅनेल्स..नाही पुर्नच निष्फळ अाहे असं मी पण म्हणतं नाही,पण एखाद्या गोष्टीच मार्केटिंग किती करावं ?त्याला किती लाइमलाईट मधे आणायचं यालाही काही मर्यादा असावी एवढचं...
इकडे शेतकरी आत्महत्या करतोय..ठिकठिकाणी दुष्काळ पडलायं..मेक इन इंडिया सारखं नवं काहीतरी चाललयं..
हे सगळं घडत असताना आमची मिडिया कुठं जाते कुणास ठाऊक??....
नाही आपलं इंडियन कल्चर खरचं चांगल आहे ..पण काही गोष्टी मात्र नक्कीच खटकतात...
अामची सगळी स्वप्न, आमच्या सगळ्या फ्यंटसी..,आयुष्यात असं वेगळं करुन दाखवायची इच्छा..समाजासाठी काहीतरी करुन दाखवायची आकांक्षा ,
असं सारकाही एका प्रश्नावर येऊन अडतं..
लोक काय म्हणतील??...आणि हो हिच गोष्ट शिकण्यासारखी आहे फॅारेन कल्चर मधुन..आपल्या भारतात म्हणजे कसं, कुणी काही नवीन,इनोव्हेटीव,बाउंड्रीच्या पलीकडलं काही करायला गेलं म्हणजे, प्रोत्साहान देणार्यांपेक्षा पाय ऒढणारेच जास्त....
प्रश्न कल्चरचा नाही, प्रश्न आहे मानसिकतेचा. आणि हो ती चेंज होणं गरजेचं..,आणि हो चेंज होण्यासाठी स्वतःपासनं सुरवात करणं महत्वाचं...मनापासनं जे वाटेल ते मनमुराद करतं सुटावं.. मात्र वर्तमानाचं भान ठेवुन, स्वतःच अगदी 100% देऊन..आणि मग आपल्याला पण अभिमानाने सांगता येइलं.."होय,मला माझ इंडियन कल्चर आवडतं..अगदी मनापासन....."
-नयन मोहितकर..
आजकाल बागेत अनेक प्रकारचे पक्षी येतात. उन्हाळ्यामूळे त्यांचा जीवामधे पण काहुर माजत असावा.घोटभर पाण्यासाठी त्याच सैरावरा हिंडण बघवत नाही.पाण्याच्या एका घोटासाठी कित...
Comments
Post a Comment