बागेतल्या त्या फुलाप्रमाणे आज प्रेम सुद्धा बहरुन आलय..
फुलपाखरांच्या सोबतीने ते अगदी नव्यानव्या रंगाने भरभरून गेलयं
अगदी सकाळी कोवळी कळी उमलावी तशी ..
माझ्या मनात हळुच आत डोकावुन प्रवेश केलेली तु..
आणि तुझ्या त्या मनमोहक अश्या
फुलाच्या सुगंधाने मदमस्त झालेले माझे मन ..
अशी एक वेगळीच दुनिया निर्माण व्हावी
आणि त्यात फक्त मी आणि तु..
त्या बहरलळ्या फुलाला सुटलेला मोहक सुगंध
वाटेत जाणार्या प्रत्येकाला मदहोश करुन टाकणारा..
साथीने असलेली काटेरी कुंपने कुठेतरी मनाला बोचणारी,
पण त्या मदहोश करणार्या प्रेमाच्या सुगंधामुळे
सारं काही विसरुन तुझ्यात गुंतलेला तो एक प्रेमळ आवाज
सहजच सांगुन जातोय ...तुझा सहवासासाठी गुदमरुन जगतोय..
अचानक ते बागेतले फुल कोमेजावे
,त्याचा रोज येणारा सुगंध कमी व्हावा
अगदीच काही वेळाने नाहीसा व्हावा
आणि त्याला सुद्धा त्याच्याविना जगणं मुश्किल व्हावं....अगदी श्वास घेण सुद्धा....
सगळं काही संपायला आलेलं
अगदी कोमेजुन मरायला टेकललं
परंतु एका क्षणी अगदी त्याच्या पायथ्याशी
उमलेलं ते नवं फुल, अगदी एखाद्या नवजात बालकाप्रमाणं त्याला जगण्याची उमेद देणारं..
त्याच्याकडे आशंकेने बघणारं,बेभान होउन...
पण मनाच्या कोपर्यात कुठेतरी अस्वस्थता जाणवणारं
ह्रदयात आस उरली होती ते फक्त तुझ्या त्या मनमोहक प्रेमाच्या सुगंधाची..
वाटेतल्या त्या तुझ्याच शेजारी बसणार्या फुलपाखरांच्या सोबतीची..
आणि अचानक एके दिवशी....कोमजलेले ते बागेतलं
बहरावं...अगदी झाडाला पालवी फुटावी तशी...
मनमुराद स्वतःत डुंबुन ....पूर्णतः बेभान होऊन ..
अगदी तुझ्यासारखं
आणि आता उरलेल्या आयुष्याला सुद्धा नवीन सुगंध सुटावा..
..अगदी मदहोश करुन टाकणारा..तुझ्यासारखा...
-नयन मोहितकर..
Comments
Post a Comment