अंधार्या त्या निर्मनुष्य रात्री
एक आवाज निनादत होता
कुणाच्या तरी चाहुलाची साद तो देत होता.
मनात त्या होते ते दुःखद अश्रू
आणि त्या अश्रूंना तो चंद्र साक्ष देत होता.
प्रेमाच्या या ऋणानुबंधामधे ती एक रात्र होती
रात्रीच्या त्या बेधुंद वातावरणात फक्त ती साथ होती
मन हे उंचच उंच झोका घेत होते
लुकलुकणार्या त्या चांदण्याचे लक्ष वेधत होते
गुंतता ते ह्रदय माझे
तुझ्या त्या आठवणीत रडत होते
ओलावलेल्या त्या पापण्यांचे सुद्धा
हात थरथरत होते....
माझ्या प्रेमात त्या,फक्त साथ तुझी हवी होती
जन्मभर नाही,पण क्षणभर तरी तु माझ्या ह्रदयात हवी होती
रात्रीच्या त्या दुर दुर जाणार्या वाटेची आठवण मला येत होती..
वाटेत त्या फक्त चाहुल तुझी हवी होती
प्रेमासाठी वाहिलेल्या त्या अश्रूंना
किंमत तुझी माहित होती..
मनातल्या त्या खोलीच्या
दुःखाची लांबी रुंदी मलाच ठाऊक होती
अजुनही त्या ह्रदयात अश्रूंना बांध फुटला होता.
आणि त्या अश्रूंना अजुनही चंद्र साक्ष देत होता
अजुनही चंद्र साक्ष देत होता.....
-नयन मोहितकर.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
Comments
Post a Comment