अशी हि पावसाची सर अलगद आली
माझ्या मनामधे चिंब काहीतरी भिजवून गेली
पाण्याच्या स्पर्शामधे एक वेगळीच नशा देउन गेली
चिंब भिजलेल्या शरीराला काहीतरी वेगळाच इशारा देऊन गेली...
ढगाळ झालेलं आभाळ बरच काही सांगत होतं
या ऒल्या वातावरणात सुद्धा कुठेतरी प्रेमाची सर शोधत होत.
पाण्याने भरून वाहणार्या वाटांमधे प्रेमाची वाट शोधत होत
आणि मनातल्या मनात कुणाच्यातरी आठवणीत भिजत होतं
या ऒल्या वातावरणात सुद्धा कुठेतरी प्रेमाची सर शोधत होत.
पाण्याने भरून वाहणार्या वाटांमधे प्रेमाची वाट शोधत होत
आणि मनातल्या मनात कुणाच्यातरी आठवणीत भिजत होतं
पाऊस अचानकच वाढला अगदी माझ्या ह्रदयाच्या ठोक्यासारखा..
आभाळसुद्धा दाटून आले अगदी माझ्या मनासारखे
शरीरात एक वेगळच चैतन्य आलं होतं
कुणाच्यातरी प्रेमाची चाहुल देऊन जात होत
ह्रदयातल्या ह्रदयात कुणाचीतरी वाट बघायला लावतं होतं
आभाळसुद्धा दाटून आले अगदी माझ्या मनासारखे
शरीरात एक वेगळच चैतन्य आलं होतं
कुणाच्यातरी प्रेमाची चाहुल देऊन जात होत
ह्रदयातल्या ह्रदयात कुणाचीतरी वाट बघायला लावतं होतं
नभ दाटुन आले होते कुणाच्यातरी आठवणीने
माझ्या जीवाला असणार्या असंख्य अश्या ऒढीने
आणि अचानकच पाऊस कमी व्हायला लागला
माझ्या जीवाला असणार्या असंख्य अश्या ऒढीने
आणि अचानकच पाऊस कमी व्हायला लागला
माझ्या मनातली चलबिचल वाढायला लागली
ह्र्दय अगदी जोर्याने धडधडायला आलेल
पावसांच्या सरींचा वेग अगदी कमी झालेला
मात्र वातावरणात आठवणीचा वेग अगदी वाढलेला
सगळं काही शांत झालेलं, मनात कुणीतरी येण्याची
चाहुल लागावी तशी...
ह्र्दय अगदी जोर्याने धडधडायला आलेल
पावसांच्या सरींचा वेग अगदी कमी झालेला
मात्र वातावरणात आठवणीचा वेग अगदी वाढलेला
सगळं काही शांत झालेलं, मनात कुणीतरी येण्याची
चाहुल लागावी तशी...
हो ती ....फक्त ती माझ्या समोरुन जावी
आणी मी तिच्याकडे मनसोक्त बघावं
थोड्यावेळाने आमची नजरानजर व्हावी
आणि सगळ्या प्रेमाच्या भावना
नजरेतल्या बोलक्या शब्दात सांगुन जाव्या
आणी एक प्रेमाने भरलेलं स्मितहास्य तिने द्याव..
आणी मी तिच्याकडे मनसोक्त बघावं
थोड्यावेळाने आमची नजरानजर व्हावी
आणि सगळ्या प्रेमाच्या भावना
नजरेतल्या बोलक्या शब्दात सांगुन जाव्या
आणी एक प्रेमाने भरलेलं स्मितहास्य तिने द्याव..
आणी अशी हि पावसाची सर पुन्हा अलगद यावी
आणि माझ्या ह्रदयातल्या स्पंदनाना प्रेमाची ऒढ
सांगुन जावी.
पुन्हा तिच्या नजरेतलं प्रेम मला कळावं
आणी तेच प्रेम भरलेलं स्मितहास्य तिने पुन्हा अलगद द्यावं
आणी अशी ही पावसाची सर पुन्हा अलगद यावी
पुन्हा अलगद यावी......
-नयन मोहीतकरआणि माझ्या ह्रदयातल्या स्पंदनाना प्रेमाची ऒढ
सांगुन जावी.
पुन्हा तिच्या नजरेतलं प्रेम मला कळावं
आणी तेच प्रेम भरलेलं स्मितहास्य तिने पुन्हा अलगद द्यावं
आणी अशी ही पावसाची सर पुन्हा अलगद यावी
पुन्हा अलगद यावी......
Comments
Post a Comment