Skip to main content

जर तू जवळ असतीस तर …… (jar tu javal astis tar)

जर  तू जवळ असतीस तर ……

जर तु जवळ असतीस तर...
हे मन असे चंचल दरवळले असते
मन फिरुन अन् फिरुन तुझ्याच ह्रदयात सामावले असते
भेटीच्या ऒढीने अगदी बेधुंद नाचले असते
आणि फिरता फिरता अगदी तुझ्याच कुशीत येउन निजले असते..
जर तु जवळ असतीस तर...  माझे हे मन तुझ्याचसाठी हसले असते....

उंचच उंच अश्या आकाशात पक्ष्यासारखी भरारी घेतले असते
तुझ्या प्रत्येक हसण्यामागचे कारण शोधत बसले असते
तुझ्या निरागस चेहर्यामागचे अल्लड भाव पाहिले असते
आणि शोधता शोधता अगदी तुझ्यच हास्यात रमले असते...
जर तु जवळ असतीस तर... माझे हे मन तुझ्याचसाठी हसले असतॆ


तुझ्या बोलणार्या त्या चेहर्याकडे बघुन मनातल्या मनातच हसले असते..
दाही दिशामधे अगदी तुझेच रुप त्याला दिसले असते
तुझ्या बेधुंद अश्या अदांकडे बघुन हरकुन गेले असते
आणि बघता बघता अगदी तुझ्यातच सामावून गेले असते.
जर तु जवळ असतीस तर...  माझे हे मन तुझ्याचसाठी हसले असत


मन हे स्रुष्टित बेधुंद फक्त तुझ्याच नशेत धुंद असते
तुझ्या नाजुक हातात हात पकडुन हक्काने ते फिरले असते.
बागेतल्या त्या फुलाप्रमाणे ते सुद्धा बहरले असते.
आणि बहरता बहरता फक्त आणि फक्त तुझ्याचसाठी कोमजले असते.
जर तु जवळ असतीस तर...  माझे हे मन तुझ्याचसाठी हसले असते.


तुझ्या प्रत्येक अश्रूंना आधार द्यायला ते तयार असते
तुझ्या प्रत्येक दुःखामधे ते बेधुंद असे सामावुन गेले असते..
तु हसल्यावर ते  मात्र हसतच गेले असते
हसता हसता मात्र ते फक्त तुझ्यासाठीच रडले असते.
जर तु जवळ असतीस तर...  माझे हे मन तुझ्याचसाठी हसले असते ...तुझ्याचसाठी हसले असते..
         -नयन मोहितकर..

Comments

Popular posts from this blog

जात म्हणजे काय?

आजकाल बागेत अनेक प्रकारचे पक्षी येतात. उन्हाळ्यामूळे त्यांचा जीवामधे पण काहुर माजत असावा.घोटभर पाण्यासाठी त्याच सैरावरा हिंडण बघवत नाही.पाण्याच्या एका घोटासाठी कित...

अश्याच एका भयाण रात्री...-Marathi Kavita

अश्याच एका भयाण रात्री... रात्री पडलेला चांदण्यांचा लख्ख प्रकाश बरच काही सांगून जात होता मनात माझ्या विचारांच दवंदव खिळवून ठेवत होता.. अश्याच एका रात्री.. आकाशात चांदण पडावं वार्याची मधेच थंडी लहर यावी.. अाणि मी तुझा हात हातात घ्यावा आणि मनामधलं सारं काही तुला एका झटक्यात सांगून द्यावं.. पण ढगांच्या त्या गडगडाटाने मी सारं काही विसरुन जावं... ती शांतता खुप भयाण वाटत होती. ह्रदयाच्या ठोक्यांना अजुन गती देत होती.. मात्र झाडांच्या पानांचा तो सळसळाट नकोसा वाटत होता. फक्त तो तिचा काही क्षणांचा सहवास हवा होता. तिच्या डोळ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम बघुन ह्रदय अगदी शांत व्हायचं. मात्र मी तसाच अबोल राहुन निघून जायचो.. तिच्याबद्दल माझ्या ह्रदयाला बरच काही सांगायचं होतं आज निश्चय केला सगळं सांगुन द्यायचा. वाट खुप लांब वाटत होती क्षणाक्षणाला माझी भिती वाढत जात होती मधेच तो रातकिड्यांचा आवाज पानांचा सळसळाट, ढगांच गडगडणं असं सार काही अंगावर काटा आणनार होतं. मी धावत पळत त्या ठिकाणी पोचलॊ मात्र ती मला दिसली नाही.. तिची आकृती सारखी डोळ्यांसमोर येत होती माझ्या ह्रदयाला झटके देऊन ...

ये कैसा धर्म ....??

ये कैसा धर्म...????*      मागे एकदा प्रवास करत असताना एके ठिकानी गाडी नाश्त्यासाठी थांबली. तसे सगळे प्रवासी उतरले, आणि मी ही त्या कॅन्टीन च्या  एका कोपर्यात एका टेबलवर बसलो.   तेव...