आयुष्यात एकदा तरी प्रेम करून बघावं ………
मनातल्या मनात कुणाकडे तरी हसून बघाव
आठवणीत एकदा तरी जवळून बघाव
डोळ्यातल्या प्रेमळ नजरेत भरभरून बघाव
आणि आयुष्यात एकदा तरी
प्रेम करून बघाव …
रात्रीच्या चांदण्यात कुणालातरी शोधून बघाव
गुलाबी थंडीच्च्या रात्री एकदातरी आठवून बघाव
चंद्राच्या लक्ख प्रकाशात हळूच डोकावून बघाव
आणि आयुष्यात एकदा तरी
प्रेम करून बघाव …
फुलाच्या सुगंधात कुणाचा तरी सुगंध मिसळून बघाव
धून प्रेमाची हि कधीतरी ऐकून बघाव
दोघातल्या दुराव्यामध्ये सुद्धा प्रेम शोधून बघाव
आणि आयुष्यात एकदा तरी
प्रेम करून बघाव …
प्रेम भरलेल्या स्पर्शामध्ये स्वताला शोधून बघाव
आठवणीतल्या आठवणीत कुणासाठी तरी रडून बघाव
जगता जगता एकदातरी कुणासाठी जागून बघाव
आणि आयुष्यात एकदा तरी
प्रेम करून बघाव …
निसर्गाच्या धुंद हवेत कुणाचातरी स्पर्श अनुभवून बघाव
भेटीच्या ओढीमध्ये मदमस्त होऊन कुणाचीतरी वाट पाहून बघाव
बघता बघता कुणाचतरी सर्वस्व होऊन बघाव
आणि आयुष्यात एकदा तरी
प्रेम करून बघाव …एकदा तरी प्रेम करून बघाव ……
- नयन मोहितकर ..
Comments
Post a Comment