Skip to main content

kavita- माझे मन



  माझे मन……. 

 माझे मन गुलाबाच्या फुलाप्रमाणे लाजतच जाते 
त्याच्या स्वताच्या विश्वात तासंनतास रमतच जाते 
आणि कधी न्हावे येणारे अश्रू  मात्र 
त्याच्या डोळ्यात दाटतच जाते 
आणि मन माझं  हे सार  काही विसरतच जाते …


प्रेमाच्या गाभार्यात सुद्धा त्याचा बेधुंद असा 
आवाज ऐकतच जाते 
कोरड्या विहिरीतसुद्धा गोडे पाणी बघतच जाते 
एवढ्या जीवघेण्या उन्हाळ्यात सुद्धा 
पावसाची सर शोधतच जाते 
आणि मन माझं सार काही विसरताच जाते …… 


उंच उडणार्या पक्षामध्ये पर्वताची उंची शोधत जाते 
 मंद झुळूकेकडे बघून हसतच जाते 
सृष्टीच्या अश्या बेधुंद वागण्यात सुद्धा 
जगण्याइतकं प्रेम शोधतच जाते 
आणि मन माझ हे सार काही विसरताच जाते …



प्रेमात घालवलेल्या क्षणांना आठवून जीवन जगतच जाते . 
त्या गुलाबी आठवणीची कदर म्हणून कि काय 
चेहऱ्यावर कोरडे हसू ठेवतच जाते …. 
मनातल्या दाटलेल्या जागेत सुद्धा
ओघळून येणारे अश्रू  साचवतच जाते … 
आणि मन माझ हे सार काही मात्र 
विसरतच जाते …… 
विसरतच जाते ……

                     -  नयन  मोहितकर .


 

 

Comments

Popular posts from this blog

जात म्हणजे काय?

आजकाल बागेत अनेक प्रकारचे पक्षी येतात. उन्हाळ्यामूळे त्यांचा जीवामधे पण काहुर माजत असावा.घोटभर पाण्यासाठी त्याच सैरावरा हिंडण बघवत नाही.पाण्याच्या एका घोटासाठी कित...

अश्याच एका भयाण रात्री...-Marathi Kavita

अश्याच एका भयाण रात्री... रात्री पडलेला चांदण्यांचा लख्ख प्रकाश बरच काही सांगून जात होता मनात माझ्या विचारांच दवंदव खिळवून ठेवत होता.. अश्याच एका रात्री.. आकाशात चांदण पडावं वार्याची मधेच थंडी लहर यावी.. अाणि मी तुझा हात हातात घ्यावा आणि मनामधलं सारं काही तुला एका झटक्यात सांगून द्यावं.. पण ढगांच्या त्या गडगडाटाने मी सारं काही विसरुन जावं... ती शांतता खुप भयाण वाटत होती. ह्रदयाच्या ठोक्यांना अजुन गती देत होती.. मात्र झाडांच्या पानांचा तो सळसळाट नकोसा वाटत होता. फक्त तो तिचा काही क्षणांचा सहवास हवा होता. तिच्या डोळ्यातलं माझ्याबद्दलचं प्रेम बघुन ह्रदय अगदी शांत व्हायचं. मात्र मी तसाच अबोल राहुन निघून जायचो.. तिच्याबद्दल माझ्या ह्रदयाला बरच काही सांगायचं होतं आज निश्चय केला सगळं सांगुन द्यायचा. वाट खुप लांब वाटत होती क्षणाक्षणाला माझी भिती वाढत जात होती मधेच तो रातकिड्यांचा आवाज पानांचा सळसळाट, ढगांच गडगडणं असं सार काही अंगावर काटा आणनार होतं. मी धावत पळत त्या ठिकाणी पोचलॊ मात्र ती मला दिसली नाही.. तिची आकृती सारखी डोळ्यांसमोर येत होती माझ्या ह्रदयाला झटके देऊन ...

ये कैसा धर्म ....??

ये कैसा धर्म...????*      मागे एकदा प्रवास करत असताना एके ठिकानी गाडी नाश्त्यासाठी थांबली. तसे सगळे प्रवासी उतरले, आणि मी ही त्या कॅन्टीन च्या  एका कोपर्यात एका टेबलवर बसलो.   तेव...