Skip to main content

गुंफता ते ह्रदय माझे.

गुंफता ते ह्रदय माझे गुंफतच गेले
नात्यांच्या त्या प्रश्नात अडकुन
सहजासहजी फसत गेले.
उरला होता तो फक्त एकटेपणा
भरला मी तो काही दिवसानी
अगदी निर्जिव वस्तुना अापल्या भावना सांगेपर्यंत...
पण नात्यांच्या मायेचा ओलावा
त्या लाकडी,लोखंडी वस्तुत मला कधी सापडला नाही

तोडुन टाकावी हि सगळी बंधने
आणि विसरावं हे जग सारं,मोहजाळाने फसलेलं
प्रेम, नातं..फक्त स्वार्थासाठी वापरणार जग हे!!!
मला मायेच्या हळुवार स्पर्शाचा अनुभव कसा देणार?

कुणीतरी म्हणालं मला,
तु प्रेम, नात,आपुलकी सगळं विसरलेला आहेस..
खरचं का?  मनाला विचारलं मी एकदा!!!
नाही विसरलो नाही,
बंद करुन ठेवल्या त्या सगळ्या गोष्टी
माझ्या पाझर नसलेल्या ह्रदयात.

ज्या व्यक्तींवर मी मनापासनं प्रेम करत आलो
अगदी स्वच्छंद,निर्मळ उडणार्या एका फुलपाखरासारखं
त्या व्यक्ति अगदी जवळ येउन ,मला सोडुन निघुन गेल्या
मग सांग ना!!प्रेम, नातं ,आपुलकी ह्या गोष्टी जपुन तरी काय करु????
गुंफलेलं हे ह्रदय, अजुन त्या विसरलेल्या नात्यांसाठी का सोडवु? का?
-नयन मोहितकर

Comments